तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका गावात एक गरीब कुंभार राहत होता. तो मडकी बनवून उदरनिर्वाह करत असे. त्याला मडकी बनवण्यासाठी मातीची फार गरज भासत असे, म्हणून त्याने माती आणण्यासाठी गाढव पाळले होते. परंतु कुंभार गरीब असल्यामुळे गाढवाला पुरेसे खायला देऊ शकत नसे.
एक दिवस कुंभार जंगलातून जात असताना त्याला एक वाघ उपाशी झोपलेला दिसतो. कुंभार त्याचा जवळ जातो, पाहतो तर तो वाघ मेलेला असतो. त्याला एक युक्ती सुचते. तो दिवसभर वाघाचे कातडे काडतो आणि घरी घेऊन येतो. रात्री कुंभार वाघाचे कातडे गाढवाच्या पाठीवर टाकतो आणि गाढवाच्या कानात सांगतो, जा आणि शेतकऱ्यांच्या शेतामधील पिक रात्रभर खा.ते तुला वाघ समजतील. ते तुला घाबरून पकडायला येणार नाहीत. तुला पकडण्याचे धैर्य त्यांना होणार नाही. अशा प्रकारे दररोज रात्री गाढव शेतकऱ्यांच्या शेतात पिक खात असे. एका रात्री गाढव शेतकऱ्यांच्या शेतामधील पिक खाण्यात मग्न होते. त्याच वेळी त्याने गाढवीणीच्या ओरडण्याचा आवाज ऎकला.लगेचच तो देखील किंचाळून प्रतिसाद देऊ लागला. सर्व शेतकऱ्यांना खरा प्रकार समजला. ते शेतकरी गाढवाला चोप देतात. आपण जे नाही ते दाखवायला गेल्यामुळे गाढवाने मार खाल्ला.
एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, …
एका मोठ्या जंगलात, अनेक प्राणी राहत होते. त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती. हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता, आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अ…
एका छोट्या गावात एक फार जुने आणि मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक प्रकारची सुंदर फुलं येत. हे झाड गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व गावकरी त्याच्या सावलीत बसायला, गप्पा मा…
अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही…
एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते …