तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका माणसाजवळ एक गाढव आणि एक कुत्रा होता. एक दिवस तो माणूस त्याच्या जानावारांबरोबर शहरातून परतत होता. गाढवाच्या पाठीवर पोती लादलेली होती. तिघेही भुकेलेले आणि थकलेले होते.
मालक नेहमी गाढवाची जादा काळजी घेत असे. त्यामुळे गाढवाला गर्व झाला होता. गाढवाला कुत्र्याशी दोस्ती करण्यात रस नव्हता. ते जंगलातून जात असताना तो माणूस थकलेला असल्यामुळे थोडा वेळ आराम करण्यासाठी जंगलात एका झाडाखाली बसला आणि त्याला झोप लागली. गाढव गवत खायला लागला. कुत्रा गाढवाला म्हंटला,""कृपा करून थोडा खाली वाक""मी तुझ्या पाठीवर असणाऱ्या पोत्या मधून थोडेसे खायला घेतो. मला खूप भूक लागली आहे. गाढवा त्याला म्हटला,""आपल्या मालकाला उठू देत, ते तुला काहीतरी खायला देतील."" कुत्रा गुपचूप झोपला.
अचानक तेथे का लांडगा आला आणि तो गाढवावर तुटून पडला. गाढव कुत्र्याला म्हणाला,""मित्रा, कृपाकरून माझे प्राण वाचव.""कुत्र्याला बदला घेण्यासाठी आयती संधी मिळाली होती. कुत्रा त्याला म्हंटला ,""आपल्या मालकाला उठू देत तो तुला वाचवेल. ""गाढव जसा वागला होता. तसेच कुत्र्याने पण उत्तर दिले.
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आ…
एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळ…
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भी…
एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यां…