तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका शेतकरी जोडप्याकडे पाळीव मुंगूस होता. एके दिवशी, शेतकरी आणि त्याच्या पत्नीला कामासाठी तातडीने घराबाहेर जावे लागले, आणि म्हणून त्यांनी मुंगूस आपल्या बाळाजवळ सोडले आणि त्याच्याकडून आश्वासन घेतले कि तो बाळाचे चांगले रक्षण करेल. शेतकरी जोडपे बाहेर गेल्यावर एक साप हळूच घरात शिरला आणि बाळावर हल्ला करण्यासाठी पाळण्याजवळ गेला. हुशार मुंगूस बाळाचे रक्षण करण्यासाठी सापाशी लढले आणि त्याने सापाला मारले. शेतकऱ्याची पत्नी घरी परतल्यावर मुंगूसच्या तोंडावर आणि दातांवर रक्ताचे डाग पाहून तिला धक्काच बसला. तिचा संयम सुटला आणि ती ओरडली, “तू माझ्या बाळाला मारलेस!” तिच्या रागामुळे तिने स्वतःवरील सर्व नियंत्रण गमावले आणि एकनिष्ठ मुंगसाला तिने मारले. जेव्हा ती घरात गेली तेव्हा तिला जिवंत बाळ आणि त्याच्या शेजारी मेलेला साप दिसला. तिला घडलेल्या प्रकाराची जाणीव झाली आणि तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप झाला.
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आ…
एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळ…
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भी…
एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यां…