तुमच्या साधनावर मराठी आवाज उपलब्ध आहे का ते पाहत आहोत…
निवांत बसा… गोष्ट सुरू होतेय!
अक्षरांचा आकार
एका गावातील एक सुतार रोज लाकडे तोडण्यासाठी जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वांना एका. सिंहाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे सिंह डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकु लागली. सिंहाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. सिंहाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
विजयनगरच्या राज्यात एकदा प्रजेतून मोठी तक्रार आली की बाजारात तांदळाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं होतं. राजा कृष्णदेवराय स्वतःही …
एकदा बादशाह अकबराने आपल्या दरबारातील पंडितांना आणि विद्वानांना एक विचित्र प्रश्न विचारला. "जगातील सर्वात जड वस्तू कोणती आणि सर्वात हलकी वस्तू कोणती?" दरबारातील सगळे विचार…
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात घुसुन पिके खाणाऱ्या चिमण्या कबुतरांसारख्या पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. त्या जाळ्यात एकदा इतर पक्ष्यांसोबत करकोचा अडकला. शेतकरी आ…
एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळ…
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. तो खूप ताकदवान आणि क्रूर होता. दररोज तो जंगलात एक प्राणी शिकार करायचा आणि खायचा. त्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये भी…
एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यां…